हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलले जाण्याची शक्यता

मुंबई - राज्यातील विधान परिषद निवडणुका १० डिसेंबरला होत आहे. त्यामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी सर्व राजकीय पक्षांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यावर हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर, कुठे आणि कधी धेणारे हे अधिकृतरित्या जाहीर करणार, अशी माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.विधान परीषदेच्या निवडणुका येत्या १० डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांची मागणी आहे की हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलावे.सूत्रांच्या माहीती नुसार हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले ६ सदस्य कदम रामदास गंगाराम (मुंबई मतदारसंघ), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), पाटील सतेज उर्फ बंटी (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम) आणि व्यास गिरीषचंद्र बच्छराज (नागपूर मतदारसंघ) यांची दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी मुदत समाप्त होत आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget