मोतीलाल नगर पुनर्विकासाबाबत आमदार विद्या ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक रहिवाशांसोबत चर्चा

मुंबई - गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मोतीलाल नगर क्रमांक १,२ व ३ च्या पुनर्विकासाबाबत आज आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक रहिवाशांसोबत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रहिवाशांसोबत संवाद साधताना आमदार महोदयांनी आपण काल,आज आणि उद्या कायम रहिवाशांसोबत आहोत आणि त्यांचे म्हणणे सरकारपर्यंत पोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत तसेच गेली ४ वर्षे आपण १६०० फुटाच्या घराची करत असलेली मागणी आता सरकारने मान्य केली आहे असे सांगितले.तसेच आपण सरकारकडे रहिवाशांकरीता २२०० ते २५०० फुटाच्या घराची मागणी,कॉर्पस फंड अशा अनेक मागण्या आपण केल्याचे  आमदार विद्या ठाकुर यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर,मुंबई भाजपचे नेते दिलीप पटेल,नगरसेवक संदीप पटेल,दीपक ठाकुर, नगरसेविका श्रीकला पिल्ले,उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष सुशील चव्हाण,मेघा चव्हाण,प्रशांत साळुंखे, राजन कांबळी,प्रल्हाद सिंग,बलवंत वर्मा,अमेय मोरे,मिलिंद वाडेकर,किशोर ठाकुर आदी उपस्थित होते.



Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget