सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना संरक्षण देणारी याचिका फेटाळली

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना संरक्षण देणारी याचिका फेटाळून लावली आहे. तुम्ही कुठे आहात हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत संरक्षण मिळणार नाही, असे न्यायालयाने सांगितले. त्यावर परमबीर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली 'मला मोकळा श्वास घेण्याची परवानगी मिळाली तर मी खड्ड्यातून बाहेर येईल'.परमबीर सिंग यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेतून सिंग यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, कोर्टाने हे संरक्षण देण्यास नकार दिला आहे. सिंग कुठे आहेत हे जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत त्यांना संरक्षण दिले जाणार नाही. ते देशात आहेत? देशाच्या बाहेर आहेत? की आणखी कुठे आहेत? असा सवाल जस्टिस संजय किशन कौल यांनी केला. तुम्ही कोणत्याच चौकशीत सामिल झाला नाहीत. तरीही तुम्हाला संरक्षणाचा आदेश हवा आहे. आमची शंका चुकीची असू शकते, पण तुम्ही जर परदेशात असाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत असाल तर आम्ही तुम्हाला संरक्षण कसे देऊ शकतो? असा सवाल कोर्टाने केला. तसेच तुम्ही कुठे आहात हे २२ नोव्हेंबर रोजी सांगा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आता या प्रकरणावर २२ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.खोट्या एफआयआरच्या माध्यमातून माझी प्रचंड छळवणूक केली असा आरोप करत पोलिस अधिकाऱ्यानेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणात सिंग यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून असलेला दिलासा २१ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आला होता.‘परमबीर सिंग हे ठाण्याते पोलिस आयुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्याच्या त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे एफआयआर दाखल करायला लावून त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली. शिवाय अंतिमत: न्यायालयाच्या निकालाने माझी निर्दोष मुक्तता झालेल्या एका प्रकरणात मला नाहक १४ महिने तुरुंगवास भोगावा लागला’ असा आरोप करत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

दरम्यान, परमबीर सिंग, पाच पोलीस आणि इतर दोघांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. २२ जुलै रोजी एका बिल्डरने हा एफआयआर दाखल केला आहे. त्यात सिंग यांच्यावर १५ कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा गुन्हे अन्वेषण विभाग चौकशी करत आहे. त्यांच्याविरोधात अजामीनपात्रं वॉरंटही जारी करण्यात आले आहे. मात्र, अद्याप पर्यंत सिंग हे पोलिसांसमोर हजर झालेले नाहीत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget