फटाके जरूर फोडा पण धूर काढू नका ; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

बारामती - दिवाळी सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात फटाके फुटणार. फटाके जरूर फोडा. पण धूर काढू नका, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. कोरोना संपलेला नाही. त्यामुळे मी हे विधान करतोय, अशी सारवासारवही मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. मला यायला अडचण होती. पण ती अडचणही सांगून टाकतो. दोन चार दिवसांपासून माझे पाय धरले. कोणी पाय धरावे एवढा मोठा मी झालो नाही. आपले आपलेच धरले. त्यामुळे चालायला आणि उभे राहायला त्रास झाला. पण मी कधीच डगमगत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शरद पवारांसारखा तरणाबांड नेता आपल्यासोबत आहे. सुप्रिया तू खरं सांगितले की खोटे… सहस्त्रचंद्रदर्शन… ज्याने विकासाचा सूर्य दाखवला… अजूनही थांबत नाही. पवारसाहेब नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचे आणि या संस्थांचे. सर्व कुटुंबच तळमळीने काम करत आहे. कुटुंब रंगले काव्यात तसे पवार कुटुंब एका ध्यासात रममी आहे, अशी स्तुतीही त्यांनी केली.

राजकारणात टीकाकार असतात असलेच पाहिजे. आम्हीही इतके दिवस तुमचे टीकाकार आहोत. शिवसेना प्रमुख म्हणायचे, अरे शरदबाबू बारामतीत काय करतात ते जरा बघितले पाहिजे हे असे संबंध होते. राजकारणात पटत नाही म्हणून एखाद्याच्या कामात विघ्न आणणे योग्य नाही. पाठिंबा देता येत नाही तर किमान विघ्न आणू नये. पण काय करावे आपल्याकडे अनेक विघ्नसंतोषी लोक आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला. राजकारणात उबवणी केंद्र असायला पाहिजे. आम्हीही उबवणी केंद्रे निर्माण केली होती. आम्ही नको ती अंडी उबवली. आता त्याचे काय झाले ते तुम्ही पाहातच आहातच, असा टोला त्यांना नारायण राणे यांना नाव न घेता लगावला.गाडीतून येताना अजितदादा सांगत होते पुण्यानंतर बारामती नंबर दोनचे केंद्र बनेल, बारामती राजकारणाचे केंद्र आहेच. पण शिक्षणाचेही केंद्र होणार आहे. इथे सगळ्याच गोष्टी शिकवल्या जातात, असे त्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.


 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget