समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ एनसीबी ऑफिसबाहेर शिवप्रतिष्ठानचे शक्तिप्रदर्शन

मुंबई - शिवप्रतिष्ठान संघटनेकडून एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह वानखेडेंचा सत्कार केला. समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीमागे उभे राहायला हवे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करताना नवाब मलिक यांच्यावर लवकरात लवकर कारवाईची मागणी त्यांनी केली.आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले आपल्या समर्थकांसह मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयासमोर दाखल झाले. थोड्याच वेळात समीर वानखेडे ऑफिसमध्ये आले. यावेळी ऑफिसच्या समोरच वानखेडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शिवप्रतिष्ठाकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. वानखेडेंना यावेळी शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. यादरम्यान, हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आज आम्ही वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या मागे उभे राहिलो आहोत, जे अमली पदार्थांचे रॅकेट उध्वस्त करु पाहत आहेत. पण महाराष्ट्रात काही वृत्ती अशा आहेत ज्या वानखेडेंविरोधात आहेत. मी मंत्री नवाब मलिक यांचा निषेध करतो तसेच त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करतो,  असे नितीन चौगुले म्हणाले.आमची संघटना राष्ट्रहितार्थ काम करणारी संघटना आहे. राष्ट्राच्या हितासाठी जे जे कुणी काम करत असतील त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे आमचे काम आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. बाकीच्या हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका ते मांडतील, असे नितीन चौगुले म्हणाले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget