कतरिना-विकी करणार लग्नाची घोषणा ?

मुंबई - सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तो म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न. डिसेंबरमध्ये दोघंही जोधपूरच्या आलिशान किल्ल्यात सात फेरे घेणार असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हे जोडपे लवकरच लग्नाचे वृत्त सर्वांसमोर ठेवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कतरिना आणि विकी जोधपूरमधील सिक्स सेन्सेस बरवारा फोर्टमध्ये आपला ‘बेस्ट डे’ सेलिब्रेट करणार असल्याचे सांगण्यात येत येत आहे. इथेच ते लग्न करणार आणि इथूनच कतरिनाची पाठवणी होणार आहे. लग्नसमारंभासाठी आगाऊ वाहनेही बुक करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांनी त्यांच्या पाहुण्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधांची व्यवस्था केली आहे. अभिनेत्री कतरिना कैफनेही तिच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. अभिनेत्री तिच्या खास मित्राच्या घरी लग्नाचे आउटफिट ट्रायल आणि सिलेक्शन करत असल्याचे वृत्त आहे. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, कतरिना आणि विकीचे लग्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. ‘सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा’ हा १४ व्या शतकातील किल्ला आहे, जो सिक्स सेन्स सेंच्युरी आणि वेलनेस स्पा मध्ये रूपांतरित करण्यात आला आहे.कतरिना आणि विकीच्या लग्नाची चर्चा असलेला किल्ला नक्कीच एका भव्य राजवाड्याची अनुभूती देतो. यामध्ये प्रसिद्ध स्थानिक खाद्यपदार्थ आणि आंतरराष्ट्रीय क्युझिन, तसेच कॉकटेल आणि व्हिस्कीची सेवा देणारी तीन रेस्टॉरंट्स आहेत. कतरिना अलीकडेच सुपरहिट ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमारसोबत झळकली होती. दुसरीकडे, विकी कौशल ‘सरदार उधम’मध्ये दिसला होता आणि या दोघांचेही बरेच चित्रपट रांगेत आहेत. विकीने ‘सरदार उधम’ चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी खूप प्रशंसा मिळवली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget