जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी अग्रेसर

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात शक्तिशाली नेते आहेत. नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढतच चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशातच नाही, तर परदेशातही सर्वाधिक आहे. अप्रुव्हल रेटिंग एजन्सीच्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. जगातील अनेक बड्या नेत्यांना मोदींनी मागे टाकले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ग्लोबल लीडर ट्रॅकरमध्ये पीएम मोदींना सर्वाधिक ७० टक्के रेटिंग मिळाले आहे. सर्वेक्षणात मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर (६६%) दुसऱ्या क्रमांकावर आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी (५८%) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जर्मन चांसलर अँजेला मर्केल (५४%) तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (४४%) सहाव्या स्थानावर आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे ४३ टक्के रेटिंगसह 7व्या क्रमांकावर आहेत. दक्षिण कोरियाचे नेते मून जे-इन ९ व्या क्रमांकावर आहेत.या यादीत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन शेवटच्या क्रमांकावर म्हणजेच १० व्या क्रमांकावर आहेत. वाणिज्य मंत्री आणि अन्न आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कु अॅपवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. मॉर्निंग कन्सल्टद्वारे दरवर्षी १३ जागतिक नेत्यांचे रेटिंग केले जाते. यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, ब्राझील, यूएसए, यूके, जपान, इटली, मेक्सिको, स्पेन, जर्मनी, फ्रान्स आणि कॅनडा यांचा समावेश आहे.मॉर्निंग कन्सल्टद्वारे प्रौढांच्या मुलाखतीद्वारे हे रेटिंग दिले जाते. मॉर्निंग कन्सल्टने भारतात यासाठी २१२६ जणांची मुलाखत घेतली. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म मॉर्निग कन्सल्टने ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, मॅक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युके आणि अमेरिकेच्या बड्या नेत्याचे रेटिंग ट्रॅक केले आहे.

Labels:

Post a Comment

Thanks for the helpful post, I was looking from long time this type of post finally I got, also visit UK news and star news for Uk trending topics, and thanks again, i will share this post my friends.

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget