मालेगाव हिंसाचार ; १८ संशयितांना अटक, ४१ जणांवर गुन्हे दाखल

नाशिक - त्रिपुरा येथील कथित घटनेवरून दंगल माजवून थेट पोलिसांना लक्ष्य करणाऱ्या १८ संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एकूण ४१ जणांवर  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मालेगावमध्ये पुकारलेल्या बंदमध्ये तब्बल पाचशे जणांचा जमाव अचानक आक्रमक बनला. त्यातील काही जणांनी जुना आग्रा रोड, बसस्थानक, किदवाई रोडवर हैदोस घातला. हॉटेल, दुकाने, घरांवर दगडफेक केली. पोलिसांची वाहने फोडली. अपर पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी, शहर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांनी कर्मचाऱ्यांसमवेत या जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संशयितांनी प्रचंड दगडफेक केली. जवळपास अडीच तास ही अराजकसृश्य परिस्थिती होती. त्यात काही जणांनी थेट पोलीस उपअधीक्षक दोंदे यांच्या सुरक्षारक्षकावर कटरने हल्ला केला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस नाईक सूर्यवंशी यांच्यावर बेछूट दगडफेक करत प्राणघातक हल्ला केला. या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी, सात जवान जखमी झाले. मालेगावमध्ये पुकारलेल्या बंदला लागलेले हिंसक वळण कटाचा भाग आहे का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्यात काही धार्मिक नेत्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मालेगाव पेटल्याने त्याचे पडसाद इतर ठिकाणी उमटले. त्यामुळे येथील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, मालेगावमधील दंगल रोखण्यात आतापर्यंत पोलीस अपयशी ठरल्याचा इतिहास आहे. आता तरी दंगेखोरांना शोधून काढून कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केली आहे. तर मंत्री छगन भुजबळ आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. शांतता राखा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget