काळे झेंडे दाखवत शेतकऱ्यांकडून महाआघाडी सरकारचा निषेध

बुलढाणा - जिल्ह्यातील चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी केली. बेसन-भाकर खावून तसेच काळे कंदील दाखवून राज्य सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा, अशी मागणी या अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून भाजपच्या वतीने करण्यात आली.

चिखली विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली नाही. गेल्या आठवड्यात भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिला होता. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट मदत मिळाली नाही, तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. गागलगाव, धार, रायपूर अशा काही गावांमध्ये शेतकरी काळी दिवाळी साजरी करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याचे दिवाळ काढले आहे. बळीराजा हा उदार आहे.पण, या बळीराजाचे बळी घेण्याचे  काम या महाविकास आघाडीने केले आहे. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिवा लावायला तेल नाही. सरकारचा निषेध करण्यासाठी काळे झेंडे दाखविण्यात आले. तसेच कंदील दाखविण्यात आला. या कंदिलात टाकायला तेल नाही. तो पेटवायचा कसा असा प्रश्न विचारण्यात आला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात भाजपच्या आमदार श्वेता महाले या सहभागी झाल्या होत्या. पंगतीत बसून त्यांना बेसन, भाकरी खाल्ली.दिवाळी हा आनंदाचा सण. हा सण सगळीकडे उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पण, चिखली तालुक्यात शेतकरी अंधारात आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अतिवृष्टीने त्यांचे नुकसान झाले. सरकारने मदत केली नसल्याने शेतकऱ्यांना दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. आता तरी राज्य सरकारने जागे व्हावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी असे त्यांचे म्हणणे आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget