गरज पडल्यास कृषी कायदे परत लागू करणार - राज्यपाल मिश्रा

जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी या कायद्यांबाबतचे वेगळच विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. गरज पडल्यास पुन्हा कृषी कायदे लागू करू, असे धक्कादायक विधान मिश्र यांनी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.भदोही येथे मीडियाशी संवाद साधताना कलराज मिश्र यांनी हे विधान केले आहे. गरज पडल्यास पुन्हा अशा प्रकारचे कायदे लागू केले जाऊ शकतात. मात्र, सध्या हे कायदे मागे घेतले जात आहेत, असे मिश्र म्हणाले. कृषी कायदे मागे घेण्यात आल्यानंतर मिश्र यांनी त्याचे समर्थन केले होते. तसेच मोदींच्या या निर्णयाची प्रशंसाही केली होती. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच होते. सरकारने शेतकऱ्यांना समजावण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र तरीही शेतकरी आंदोलनावर ठाम होते. कृषी कायदे मागे घ्या म्हणून अडून बसले होते. त्यामुळेच सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागले, असे त्यांनी म्हटले  होते.
 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget