ईडीकडून अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना समन्स

नागपूर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईत अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) अटक केल्यानंतर त्यांच्या अडचणींत आणखी वाढ होताना दिसत आहे.  आता ईडीकडून अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना समन्स पाठविण्यात आले. ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नागपूरच्या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी शुकशुकाट पसरला आहे.काल अनिल देशमुख यांची मेडिकल चाचणी झाली. त्यानंतर दुपारी दोन वाजता ते बाहेर आल्याची माहिती त्यांचे वकील इंदरपाल सिंह यांनी माध्यमांना दिली. देशमुख यांची चौकशी संपल्यानंतर क्लोजर स्टेटमेंट घेण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सहा नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोठडी सुनावली आहे. त्यामुळे  त्यांच्या नागपुरातील सिव्हील लाईन्स येथील निवासस्थानी फक्त काम करणारे कर्मचारी होते. देशमुख यांच्या कुटुंबातील एकही सदस्य येथे उपस्थित नव्हते. राज्याचे माजी गृहमंत्री असल्याने त्यांच्या घरासमोर पोलिसांची सुरक्षा लावण्यात आली आहे. वारंवार नोटीस बजावूनही ते न्यायालयात हजर झाले नव्हते. शेवटी ईडीसमोर हजर झाले. 


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget