मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या डेलकरांचा दणदणीत विजय

दादरा नगर हवेली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा प्रचंड विजय झाला. तब्बल ५० हजाराच्या मताधिक्याने डेलकर विजयी झाल्या. शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेरचा पहिलाच विजय असून या निमित्ताने शिवसेने महाराष्ट्राबाहेर विजयाचे खाते खोलले आहे.दादरा नगर हवेलीतील माजी खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे लोकसभेची ही जागा रिक्त झाली होती. कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने कलाबेन यांना तिकीट दिले होते. आज झालेल्या मतमोजणीत कलाबेन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार महेश गावीत यांचा ४७ हजार ४४७ मतांनी पराभव केला. आज सकाळी साडे आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण २२ राऊंड पार पडले. यावेळी कलाबेन यांना एकूण १,१२,७४१ मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महेश गावीत यांना ६३ हजार ३८२ मते मिळाली. दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबईत आत्महत्या केली होती. मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचे महाराष्ट्र विधानसभेत पडसादही उमटले होते. मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. १९८९ मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र २०१९ मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.

दादरा नगर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. राऊत यांनी दादरा नगर हवेलीत झंझावाती प्रचार केला होता. डोअर टू डोअर कॅम्पेन, रॅली आणि प्रचार सभांवर त्यांनी अधिक जोर दिला होता. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रचारात भाग घेतला होता. कलाबेन डेलकर यांनीही प्रचाराचे रान उठवले होते. तसेच प्रचाराचा नियोजनबद्ध कार्यक्रम आणि मतदारांचा कौल यामुळे त्यांचा विजय सोपा झाला.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget