इम्रान खान यांना ‘बडे भाई’ म्हटल्याने सिद्धू अडचणीत

चंदीगड - पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी शनिवारी पाकिस्तानातील कर्तारपूरला पोहोचले. तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे भावूक झालेले नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ‘बडे भाई’ अशी उपमा दिली. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. जनरल बाजवा आणि इम्रान खान हे दोघेही नवज्योत सिंह सिद्धू यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याची टीका त्यांच्यावर नेहमीच होते. मात्र आता इम्रान खान यांना ‘बडे भाई’ म्हणून संबोधल्यानंतर संपूर्ण देशवासियांसाठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो, अशी टीका भाजप नेत्यांनी केली आहे. मात्र या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना नवज्योत सिंह सिद्धू म्हणाले, हल्ली लोक कोणत्याही गोष्टीचा बाऊ करतात. भाजपला काय टीका करायची आहे, ती करू द्या. मी फक्त गुरुद्वाऱ्यात दर्शनासाठी गेलो होतो. याआधीही अशी टीका झाली आहे. मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचे हे प्रयत्न आहेत.

पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना ‘बडे भाई’ म्हणाले. पाकिस्तानमध्ये कर्तारपूर कॉरिडोअरच्या सीईओंसोबत चर्चा करताना हे वक्तव्य केले. पंजाबच्या इतर कॅबिनेट मंत्र्यांसोबत कर्तारपूर साहिब गुरुद्वाऱ्यात दर्शन घेण्यासाठी ते कर्तारपूरमध्ये गेले होते. तेथेही पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर आपले खूप प्रेम आहे, असे वक्तव्यही सिद्धू यांनी केले. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली.नवज्योत सिंह सिद्धू यांच्या या वक्तव्यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, 'काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू पाकिस्तानला जाऊन इम्रान खान किंवा पाकिस्तानची स्तुती करणार नाहीत, असे होऊ शकत नाही. इम्रान खान यांना ‘बडे भाई’ संबोधणे ही कोट्यवधी भारतीयांसाठी मोठी चिंतेची बाब आहे.पंजाबमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे नवज्योत सिंह सिद्धू यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरू शकते. इम्रान खान सध्या भारतात दहशतवादी कारवाया वाढवताना दिसत आहेत. त्यामुळे त्याला ‘बडा भाई’ म्हणणे हा राजकीय मुद्दा होऊ शकतो. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर हे आधीपासूनच सिद्धू यांच्याविरोधात टीका करत असतात. इम्रान खान आणि बाजवा यांच्याशी सिद्धू यांचे जवळचे संबंध आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. कॅप्टन अमरिंदर सिंह हे भाजपशी हातमिळवणी करणार आहेत.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget