वानखेडेंच्या चौकशीसाठी दोन एसआयटीची स्थापना ; नवाब मलिक यांनी केले ट्विट

मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्या हातातून काढून घेण्यात आला आहे. यावर आपल्याला तपासातून काढण्यात आले नाही. प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून व्हावा अशी याचिका मीच न्यायालयात दाखल केली होती, असा दावा केला. यावर सकाळी नवाब मलिकांनी आणखी एक टि्वट केले असून वानखेडेंना लक्ष्य केले आहे. समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी आपणच केली होती असा दावा केला आहे. आर्यन खानचे अपहरण केले आणि खंडणी मागितली या प्रकरणी समीर वानखेडेंची चौकशी करावी अशी मागणी केली होती. आता केंद्र आणि राज्य अशा दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. या दोन्ही पैकी कोण समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचा खरा चेहरा समोर आणते ते पाहुयात असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.मुंबई एनसीबीकडे असलेल्या सहा प्रकरणाचा तपास एनसीबीचे एसआयटी पथक करणार आहे. एनसीबीच्या महासंचालकांकडून हे एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच तपास करण्यात येत असलेल्या या प्रकरणांच्या तपासातून कोणत्याही अधिकाऱ्याला काढण्यात आलेले नाही, आधीचे सर्व अधिकारी तपासात असतील, असे स्पष्टीकरण एनसीबी दिल्लीकडून देण्यात आले आहे.समीर वानखेडे एनसीबीच्या मुंबई कार्यालयातील प्रादेशिक संचालक आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये त्यांची महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीवर बदली झाली होती. अमली पदार्थांशी निगडीत प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget