३० नोव्हेंबरपर्यंत मतदारयादीत नाव समाविष्ट करा ; निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील तब्बल ५७ हजार मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मतदारांना निवडणूक आयोगाने संधी दिली आहे. यामध्ये १ जानेवारी २०२२पर्यंत ज्या मतदारांची वयाची १८ वर्षे पूर्ण होत आहेत, अशांनी तसेच ज्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत, अशा मतदारांना स्वत:ची नावे ३० नोव्हेंबरपर्यंत मतदारयादीत समाविष्ट करता येणार आहेत. त्यामुळे मतदारांनी स्वत:ची नावे या वेळेत मतदारयादीत येण्यासाठी मतदार नोंदणी अर्ज भरावा आणि स्वत:चे नाव मतदारयादीत समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यामुळे ज्या मतदारांची नावे मतदारयादीत नाहीत, त्यांना महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे या कार्यक्रमाच्या कालावधीत नव्याने मतदारयादीत नावे समाविष्ट करणे, वगळणे तसेच मतदारयादीत नाव समाविष्ट आहे की नाही, याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबतची माहिती देणे व जनजागृती करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक महापालिका मुख्यालयात झाली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, निवडणूक विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगेरे, बेलापूर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शीतल रसाळ तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी अर्ज नमुना ६ भरून करून घ्यावी. तसेच, महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारयादीत नाव समाविष्ट नाही म्हणून मतदान करता आले नाही, अशी स्थिती उद्भवू नये, यासाठी मतदारयादीत आपले नाव आहे की नाही, याची खातरजमा करून घेणे गरजेचे आहे. स्वत:चे नाव मतदारयादीत असल्याची खात्री करून घेण्यासाठी www.nvsp.in या पोर्टलवरून अगदी मोबाइलवरही नाव शोधता येऊ शकते. ५ जानेवारी २०२२ रोजी जी मतदारयादी प्रसिद्ध होईल, तीच यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. मतदारयादी अद्ययावत करण्याची कार्यवाही दोन्ही विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत सुरू असून राजकीय पक्षांनीही या कामात सहकार्य करण्याच्या भूमिकेतून मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमावेत आणि आपल्या प्रभागातील मतदारांची नावे मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करून घ्यावीत, असे आयुक्तांनी राजकीय प्रतिनिधींना सांगितले आहे. या प्रतिनिधींना ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदार नोंदणी कार्यालयामार्फत रीतसर ओळखपत्रे दिली जाणार असून ते त्यांच्या मतदान केंद्र क्षेत्रातील दररोज जास्तीत जास्त १० अर्ज दाखल करू शकणार आहेत.

अर्ज नमुना - ६ नुसार मतदारयादीत नाव समाविष्ट करता येईल. अर्ज नमुना - ७ नुसार मतदारयादीतील नावास आक्षेप घेणे किंवा नाव वगळता येईल, अर्ज नमुना - ८ नुसार मतदारयादीतील नोंदीच्या तपशीलामध्ये दुरुस्ती करता येईल तसेच अर्ज नमुना - ८ अनुसार मतदारयादीतील नोंदीचे स्थानांतर करता येईल. यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. यासाठी पालिका हद्दीत ५७ ठिकाणी शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. येथे हे अर्ज भरून देता येणार आहेत.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget