वाहने चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

नवी मुंबई - हायटेक पद्धतीने डुप्लिकेट चाव्या तयार करून महागड्या गाड्या चोरणाऱ्या टोळीतील आणखी पाच आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या टोळीने मुंबई, नवी मुंबईसह इतर भागातून चोरून नेलेल्या अनेक गाड्यांचे मूळ इंजिन नंबर, चेसिस नंबर मिटवून त्यावर क्रॅप डिलरकडून मिळविलेले अपघातग्रस्त गाडीचे इंजिन चेसिस नंबरवर प्रिंट करून, त्याद्वारे बनावट कागदपत्रे तयार केली होती. या गाड्यांची गुजरात व पश्चिम बंगालमध्ये विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेने या टोळीने परराज्यांत विकलेल्या एकूण १८ गाड्या हस्तगत केल्या आहेत. या टोळीत सहभागी असलेल्या अन्य सहा आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.जुलै महिन्यामध्ये गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने वाहनचोरीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी मोहम्मद तौफिक हबीबुल्ला व त्याचा साथीदार मनोज गुप्ता या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून १२ गाड्याचोरीचे गुन्हे उघडकीस आणून सात गाड्या हस्तगत केल्या होत्या. या गुन्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय गाड्याचोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचे तसेच गुन्ह्यांतील चोरलेल्या गाड्या परराज्यांत विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार, गुन्हे शाखेने टोळीतील सहभागी असलेल्या मनीष चोवटीया (४७) याला गुजरात येथून, जमाल्लुद्दीन सहा (४५) याला घाटकोपर, तर पश्चिम बंगालमधून नौशाद अन्सारी उर्फ पाठक (४४) मो. राशीद अली (३५), आणि सुमित जालना (४०) या पाच आरोपींना अटक केली. या आरोपींकडून ८२ लाख रुपये किमतीच्या ११ गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईत आठ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून अन्य तीन गाड्यांचे इंजिन नंबर व चेसीस नंबरमध्ये खाडाखोड केली असल्याने त्यांचे मूळ क्रमांक सापडलेले नाहीत. यातील तौफिकवर २७, मनीषवर ४४ तर, मनोजवर तीन गुन्हे दाखल आहेत.मुख्य आरोपी तौफियत हा सराईत गाडीचोर असून तो मागील अनेक वर्षांपासून गॅरेजमध्ये काम करत होता. त्यामुळे त्याला सर्व प्रकारच्या वाहनांच्या अंतर्गत भागांची चांगली माहिती आहे. जी गाडी त्याला चोरायची आहे, त्या गाडीची काच फोडून तो दरवाजा उघडतो. त्यानंतर गाडीचे बोनट उघडून सायरन नोड बंद करतो. त्यानंतर तो पुन्हा गाडीमध्ये जाऊन ओसीएम सॉकेट बनविल्यानंतर पुन्हा एक्सटर्नल वायरने बॅटरी व फ्युज बॉक्स जोडतो. त्यानंतर आधुनिक पद्धतीचा टॅब वापरून त्याला वायफायने जोडून गाडीचे 'स्विच ऑन, ऑफ की'वर चावी ठेवून कोड डीकोड करतो. त्याद्वारे डुप्लिकेट चावी बनविल्यानंतर एक्सटर्नल नट बॉक्स व बॅटरीला जोडलेली वायर काढून डुप्लिकेट चावीने तो सहज गाडी चोरून नेत असल्याचे तपासात आढळून आले आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget