मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला; लष्करी अधिकाऱ्यासह संपूर्ण कुटुंब शहीद

इम्फाळ - मणिपूरच्या सूरज चंद जिल्ह्यात शनिवारी घात लावून दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आसाम रायफल्सच्या एका लष्करी अधिकाऱ्यासह संपुर्ण कुटुंब शहीद झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १०.०० वाजल्याच्या सुमारास सूरज चंद जिल्ह्याच्या म्यानमार सीमेजवळ सिंगनगट उपखंडातील एस सेहकेन गावात ही घटना घडली. या भागातून लष्करी अधिकाऱ्यांचा ताफा जात असताना आधीपासूनच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. कर्नल विप्लव त्रिपाठी (कमांडिंग ऑफिसर - ४६ एआर), त्यांची पत्नी आणि या जोडप्याचा मुलगा अशा तिघांचा हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. तसेच या हल्ल्यात आणखी तीन 'क्विक रिअॅक्शन टीम' (QRT) सदस्यांचाही मृत्यू झाला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget