रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' चित्रपट नेटफ्लिक्सवर झळकणार

मुंबई - अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाला लोक खूप प्रेम देत आहेत. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर धम्माल करणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला ८ दिवस पूर्ण झाले असून या ८ दिवसात चित्रपटाने १२० कोटींहून अधिक कमाई केली आहे. १०० कोटी क्लबमध्ये चित्रपटाचा समावेश झाल्यानंतर निर्मात्यांनी आता चित्रपट ओटीटीकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांनी नेटफ्लिक्सशी हातमिळवणी केल्याचे वृत्त आहे.'सूर्यवंशी'च्या ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांनी नेटफ्लिक्सशी तगडा करार केला आहे. रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट नेटफ्लिक्सने १०० कोटींना विकत घेतला आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा 'सूर्यवंशी' चित्रपट ४ डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार असल्याची माहिती आहे. लवकरच निर्माते ओटीटी रिलीजची घोषणा देखील करू शकतात.

कोरोनामुळे 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट गेल्या वर्षीपासून पुढे ढकलली जात होती. निर्माते चित्रपटगृहे उघडण्याची वाट पाहत होते. कोरोनाचा वेग कमी होताच सरकारने सिनेमागृहे उघडण्याचे आदेश दिले. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. 'सूर्यवंशी' हा कोराना महामारीनंतर ओटीटीवर विकला जाणारा सर्वात महागडा चित्रपट आहे. तथापि, ११ डिसेंबरपासून 'सूर्यवंशी' ओटीटीवर दाखवला जाऊ शकतो अशी बातमी आली होती.चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याच्या चार आठवड्यांनंतरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हे देखील एक मोठे कारण आहे, की ओटीटी प्लॅटफॉर्मने मोठ्या रकमेत चित्रपट विकत घेतला आहे. कारण सहसा असा करार थिएटर रिलीज झाल्यानंतर आठ आठवड्यांसाठी केला जातो. अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' आंतरराष्ट्रीय स्तरावर ६६ देशांमध्ये १३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या देशांमध्ये उत्तर अमेरिका, यूएई, ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन सारख्या इतर अनेक देशांचा समावेश आहे. हा एक विक्रम आहे. 'सूर्यवंशी' भारतात ४ हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget