बालदिन बहुविकलांगांसोबत उत्साहात साजरा

मुंबई - सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था बहुविकलांगांसाठी गेल्या ५० वर्षापासून कार्यरत आहे.पद्मभूषण स्व.डाॅ.नोशीर वाडीया यांनी स्थापना केली असून,श्रीमती.मंजुषा सिंह या संस्थेच्या सेक्रेटरी व सीएसओ म्हणून काम पाहतात. १४ नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून सीपीए व स्वराज्य युथ फोरमच्या संयुक्त विद्यमाने संगीत खुर्ची,नृत्य,चेंडू फेक इ.स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला.विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.'चिल्ड्रेन स्पेशल डे'चा केक कापण्यात आला.संस्थेच्या वतीने स्वराज्य युथ फोरमचे अध्यक्ष श्री.चेतन कोरगावकर व सहकारी यांचे श्रीमती.मंजुषा सिंह यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करून संस्थेसोबत इतर उपक्रमांमध्ये सहभागी होऊन योगदान देण्याचे आवाहन केले.श्री.चेतन कोरगावकर यांनी आपल्या ४० वर्षातील इतर उपक्रमांपेक्षा हा बालदिन मनाला आनंद देणारा व प्रोत्साहीत करणारा दिवस असल्याची कबूली दिली.कार्यक्रमास स्वराज्य युथ फोरमचे श्री.किरण सुर्वे,श्री.   अॅड्रयू रिबेलो,श्री.धिरेन मिस्री,श्री.अनिल सुर्वे,श्री.महेश पटेल,श्री.संतोष शर्मा,श्री.निलेश झंझे,श्री.आनंद शिंदे,श्रीमती.सायली कोरगावकर इ.मान्यवर उपस्थित होते.सीपीएचे श्री.राजू गोल्लार,   श्रीमती.हर्षा मालम,श्री.शशीकांत फडके,समाजसेक श्री.धनंजय पवार,महाराष्ट्र राज्य टू व्हीलर यूज़र्स असोसिएशन दिव्यांग विभाग प्रमुख श्री.गिरीश कटके,रूग्ण सेवक श्री. जयकिशन डुलगच इ.मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सीपीएचे सल्लागार श्री.विनोद साडविलकर यांनी केले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget