लस घेतली नाही तर टीएमटीमध्ये प्रवेश नाही ; ठाणे महापालिकेचा निर्णय

ठाणे - करोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून व्यापक मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमध्ये लसीचा एकही डोस न घेतलेल्या प्रवाशांना प्रवेश निषिद्ध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. ठाण्यात लसीकरण मोहिम सुरु असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे आणि एकमेकांपासून दुसऱ्याला करोनाचा संसर्ग होवू नये यासाठी खबरदारी म्हणून लसीकरणाचा किमान एक डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात येईल असे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले आहे. यासाठी नागरिकांनी लसीकरणाचा एक किंवा दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास जवळ बाळगणे गरजेचे आहे, असे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

मागील काही दिवसामध्ये लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या माध्यमातून यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून सर्वत्र लसीकरण केंद्रही सुरु करण्यात आलेली आहेत. 'जम्बो लसीकरण मोहिम', 'लसीकरण ऑन व्हील' तसेच नुकतेच 'हर घर दस्तक' हा उपक्रम सुरू केला आहे. तरी ठाण्यातील नागरिकांनी लसीकरणाच्या अफवावर विश्वास न ठेवता नि:संकोचपणे लसीकरण करुन घ्यावे. आणि स्वत:सह आपले कुटुंब, आपले शहर सुरक्षित ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget