दिल्ली एसआयटीची टीम आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह 'या' सहा प्रकरणाचा करणार तपास

मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेतला आहे. १६९६ च्या बॅचचे आईपीएस अधिकारी आणि उपमहासंचालक संजय कुमार सिंह (SIT) यांच्याकडे आर्यन खानसह अन्य सहा प्रकरणांचा तपास हा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली SITची टीम शनिवारी मुंबईत दाखल झाली. दिल्ली एसआयटी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या संदर्भातील सर्व कागदपत्रांची पाहणी करणार आहे. तसेच कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर चौकशीला सुरुवात करणार होणार आहे. आर्यन खान प्रकरणातील पुन्हा सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.एनसीबीची एसआयटी टीम आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह अन्य ६ प्रकरणांचा तपास करणार आहे. एनसीबीची एक टीम आर्यन खान याच्याशी जोडलेले क्रूज ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणार आहे. मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान या प्रकरणाचा तपास हा एसआयटी करणार आहे. नुकतेच ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलेल्या अरमान कोहली प्रकरणाचा तपासही एसआयटी करणार आहे. या व्यतिरिक्त अन्य तीन प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेऊन नवीन टीम करणार आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget