समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - दिलीप वळसे पाटील

मुंबई - त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात शुक्रवारी मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांना अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. त्यानंतर अमरावतीमध्ये भाजपच्या वतीने शनिवारी बंदची हाक देण्यात आली होती. अमरावती बंदला सुद्धा हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले. अमरावतीत जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाने अमरावती बंदची हाक दिली होती. हा बंद शांततेत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, दुर्दैवाने त्यात अप्रिय घटना घडल्या आहेत. मालमत्तेचे नुकसान झाले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढे म्हटले, विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत सुद्धा चर्चा केली आहे. त्यांनाही विनंती केली आहे की, आपले राज्य महत्त्वाचे आहे आणि त्या दृष्टीने शांतता राहील यासाठी सहकार्य करा. अमरावतीत शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करा. राज्यातील सर्व भागांत शांतता आहे. अमरावतीत एक घटना घडली आहे आणि तेथील परिस्थितीत लवकरच नियंत्रणात येईल. समाजात द्वेष निर्माण करणारे किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.आंदोलनास कोणालाही परवानगी नव्हती, फक्त निवेदन देण्यास आणि स्वीकारण्यास परवानगी होती. सोशल मीडियातून सुद्धा अफवा पसरवू नये, सोशल मीडियावर चुकची माहीती पसरवू नये. सर्व नागरिकांनी शांतता राखा, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, नागरिकांनी शांतता राखण्यासाठी मदत करावी असे आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget