रजा अकादमीवर बंदी घाला, नाही तर आम्ही त्यांना संपवू ; राणेंचा सरकारला इशारा

मुंबई - महाराष्ट्राच्या काही शहरामध्ये काल दंगलसदृश्य स्थिती होती. ह्या सर्व घटनेच्या पाठीमागे रजा अकादमी असून तिच्यावर बंदी घाला, नाही तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू असा इशारा भाजपा नेते नितेश राणे यांनी दिला. राणे यांनी ट्विट करत हा इशारा दिला आहे. नितेश राणे हे सध्या आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी एसटी कामगारांच्या संपावरुनही सरकारला विशेषत: परिवहन मंत्री परबांना चांगलेच खडसावले होते. त्यानंतर त्यांच्या टार्गेटवर आता रजा अकादमी असल्याचे दिसत आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत सरकार तसच रजा अकादमीला टार्गेट केले. ते ट्विटमध्ये म्हणाले कि, ‘महाराष्ट्राच्या विविध भागात जी हिंसा आणि दंगल उसळली त्याच्या पाठीमागे अतिरेकी संघटना रजा अकादमीच आहे. प्रत्येक वेळेस ते शांतता भंग करतात, सर्व नियम पायदळी तुडवतात आणि सरकार बसून राहते, बघत बसते. सरकारने एक तर यांच्यावर बंदी घालावी अन्यथा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू’.त्रिपुरामध्ये जमावाने मशिद पेटवल्याची अफवा महाराष्ट्रात पसरली. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी विविध ठिकाणी मुस्लिम मोर्चे काढले गेले. त्यात अमरावती, नांदेड, भिवंडीत जमाव हिंसक झाला. अमरावतीत तर जमावाने दुकाने फोडली, दुचाकी तोडल्या. पोलीसांवर दगडफेक केली. बघता बघता महाराष्ट्राच्या काही शहरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. भिवंडी-नांदेडमध्ये रजा अकादमीच्याच काही तरुणांनी कायदा हातात घेऊन दगडफेक केल्याचा आरोप आहे. नांदेडच्या एसपींनी ह्या घटनेला दुजोरा दिला आहे. 

नांदेडमध्येही मुस्लिम मोर्चा हिंसक झाला. त्यावर बोलताना नांदेडचे एसपी प्रमोदकुमार शेवाळे म्हणाले, नांदेडमध्ये रजा अकादमीने प्रोटेस्टचे आयोजन केले होते. त्यातले काही तरुण मिक्स लोकसंख्या असलेल्या रहिवाशी भागात जायला निघाले. पोलीसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी दगडफेक केली. त्यानंतर मग पोलीसांनी त्यांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget