जे एअर इंडिया, रेल्वे विकतात, त्यांनी एसटीवर बोलू नये - बाळासाहेब थोरात

मुंबई - राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप दोन आठवड्यांहून अधिक काळ चालू आहे. राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी चालू असणारा हा संप दिवसेंदिवस चिघळताना दिसून येत आहे. भाजपा हा संप अधिक पेटवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप वारंवार सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भाजपला सुनावले आहे. माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजपा एसटी कर्मचाऱ्यांचा संप पेटवण्याचा प्रयत्न करत आहे हे उघड आहे. खरे म्हणजे ज्यांनी एअर इंडिया विकली, रेल्वे विकतायत, त्यांना आता एसटीवर बोलण्याचा अधिकार नाही. एसटी कामगारांच्या हिताची जपणूक महाविकास आघाडीने आत्तापर्यंत केलेली आहे. अजूनही परिवहन मंत्री त्यांच्याशी चर्चा करत आहेत. लवकरच मार्ग निघेल. आमचीही परिवहन मंत्र्यांशी चर्चा चालू आहे.दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच भाजपावर टीकाही केली आहे. ते म्हणाले, आम्ही आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही. पण विलिनीकरणाचा मुद्दा हा समितीच्या माध्यमातूनच सोडवला जाईल. आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे. पण कुणाच्या सांगण्यावरून किंवा भडकवण्यावरून आंदोलन करू नये. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले तर हे कोणीही नेते येणार नाहीत. या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा उद्देश नाही. परंतु, राजकारण करण्यासाठी काही लोक भडकवत आहेत, राजकारणासाठी काही लोक कामगारांना उसकवत आहेत. न्याय मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही नुकसान करून घेऊ नका.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget