बनावट नोटांचे प्रकरण दाबले गेले, तेव्हाही वानखेडेंकडेच चार्ज होता ; नवाब मलिकांचा सवाल

मुंबई - चार वर्षांपूर्वी १४ कोटींच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. त्यानंतर हे प्रकरण दाबले गेले. त्यावेळीही समीर दाऊद वानखेडेच अधिकारी होते. हा योगायोग होता काय? असा सूचक सवाल करतानाच देवेंद्र फडणवीसांनीच हे प्रकरण दाबण्यासाठी मदत केली होती, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोपांचा भडिमार केला. नोटाबंदीच्या एका वर्षानंतर १४ कोटी ५६ लाखांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. त्यावेळी या केसचे इनचार्ज समीर दाऊद वानखेडे होते. डीआयआरमध्ये ही केस झाली होती. १४ वर्षांपासून वानखेडे मुंबईत पोस्टिंगवर राहिले. पोस्टिंग ज्वॉइंट कमिशनर इंटेलिजन्स रेव्हेन्यू म्हणून १ जुलै २००७मध्ये त्यांची पोस्टिंग झाली. त्यावेळी त्यांच्याकडे त्याच डिपार्टमेंट होते. त्यांनीच छापेमारी केली होती. ही केस कमकुवत करण्यासाठी फडणवीसांनी डीआयआरला मदत केली. हाजी अराफतचे  प्रकरण दाबले होते. तसे हा योगायोगा असू शकतो, असे सांगतानाच म्हणूच कदाचित या अधिकाऱ्याला आता वाचवण्यासाठी फडणवीस या प्रकरणावरून लक्ष हटवत असावेत, असा संशय मलिक यांनी व्यक्त केला.८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी झाली. तेव्हा नोटांबंदीमुळे दहशतवाद खतम होईल. काळापैसा बंद होईल. बनावट नोटा संपवण्यासाठी नोटाबंदी करण्यात येत आहे. नोटाबंदी नंतर संपूर्ण देशात २००० आणि ५०० च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. तामिळनाडू, पंजाबमध्ये बनावट नोटांवर कारवाई झाली. पण ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात एकदाही बनावट नोटा पकडल्या गेल्या नाहीत. कारण फडणवीसांच्या संरक्षणात राज्यात बनावट नोटांचा धंदा सुरू होता. ८ ऑक्टोबर २०१७ रोजी १४ कोटी ५६ लाखांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटांचे नेक्सस दाऊद, बागंलादेश आणि पाकिस्तान पर्यंत आहे, असा दावाही त्यांनी केला.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget