‘आर्याने माझे आयुष्य बदलले’ ; सुष्मिता सेनने व्यक्त केल्या भावना

मुंबई - राम माधवानी दिग्दर्शित आर्या सीझन २ लवकरच डिस्ने + हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे. सुष्मिता सेन अभिनीत या ऍक्शन ड्रामाच्या पहिल्या सीझनचे खूप कौतुक झाले आणि अलीकडेच निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनचा जबरदस्त टीझर प्रदर्शित केला. अभिनेत्री पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत परतत असून, आर्याने तिच्या आयुष्यावर केलेल्या प्रभावाबद्दल भाष्य केले. याविषयी बोलताना सुष्मिता सेन म्हणाली की, ‘मला वाटते की आर्यच्या आधी, मी एका कलाकाराप्रमाणे होते, वैयक्तिक आघाडीवरही मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, सोबतच आव्हानात्मक अशा ५ वर्षांच्या कालावधीचा सामना केला आहे. मला असे वाटते की, जगाने मला बक्षीस द्यावे कारण. मी असे काम केले आहे जिथे पोहोचणे खूप कठीण आहे. आणि मी आर्याला ते बक्षीस म्हणू शकते. केवळ व्यावसायिक स्तरावर नाही, ती अगदी योग्य वेळी माझ्याकडे आली. आर्याची भूमिका साकारणे हा एक उत्तम अनुभव होता आणि तो यशस्वीपणे साकारण्यासाठी, कुटुंबाला एकत्र ठेवू शकणारी आई आणि स्त्री यांचे नाते दाखवणे, जरी कुटुंब अंडरवर्ल्ड आणि ड्रग माफियाशी संबंधित असले तरीही ती त्याला एकत्र जोडते.’ सुष्मिता पुढे म्हणाली की, ‘मला वाटते आर्यने माझे आयुष्य अनेक पातळ्यांवर बदलले आहे. एक अभिनेत्री म्हणून आर्याचा एक भाग बनणे हा एक रोमांचक अनुभव होता आणि ही एक सुंदर सीरिज आहे. मला वाटते की हा एक अष्टपैलू अनुभव होता, ज्याने माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल केले आहेत.’ नुकताच ‘आर्या २’चा टीझर निर्मात्यांनी प्रदर्शित केला, ज्यामध्ये प्रेक्षकांना सुष्मिताच्या उत्कट व्यक्तिमत्त्वाला जवळून पाहण्याची संधी मिळाली, ज्यानंतर आता प्रत्येकजण सीरिजच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. सुष्मिता सेन बॉलिवूडची एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट कामगिरी केल्या आहेत. गेल्या वर्षी, सुष्मिता १० वर्षांनी अभिनय क्षेत्रात परतली आहे. ती क्राईम सीरीज ‘आर्या’द्वारे  प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जेव्हा, बरेच कलाकार बऱ्याच काळानंतर चित्रपट आणि शोमध्ये परततात, तेव्हा त्यांना पूर्वीसारखा चांगला प्रतिसाद मिळत नाही, पण सुष्मिताने ‘आर्या’मधील तिच्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget