१ डिसेंबरपासून गोरेगाव ते पनवेल रेल्वे धावणार ; आमदार विद्या ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई - गोरेगावच्या आमदार व माजी राज्यमंत्री सौ.विद्या ठाकुर यांनी सतत पाठपुरावा करत हार्बर रेल्वे मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार व्हावा ही केलेली मागणी अखेर रेल्वे प्रशासनाकडुन मान्य करण्यात आली आहे.येत्या १ डिसेंबरपासून पनवेल ते अंधेरी व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरी या रेल्वे गाड्यांचा विस्तार गोरेगाव पर्यंत होणार असून यामुळे अनेक प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.सन २०१७ पासून आमदार विद्या ठाकुर या स्वतः पाठपुरावा करत असून अनेक वेळा याबाबत बैठका देखील घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या विस्तारीकरणामुळे जोगेश्वरी,राम मंदिर व गोरेगावच्या रहिवाशांना मोठा फायदा होणार असून विना अडथळा थेट नवी मुंबई गाठणे शक्य होणार आहे. याप्रसंगी आमदार विद्या ठाकुर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget