बनावट दारू प्यायल्याने ४२ जणांचा मृत्यू ; १९ दारू विक्रेत्यांना अटक

पाटना - बिहारमध्ये बेकायदेशीर दारू पिण्याने मृत्यांचा आकडा वाढतच चाललाय. शनिवारी ही संख्या ४२ वर पोहोचली. पोलिसांनी या प्रकरणात १९ दारू विक्रेत्यांना अटक केली आणि इतर सहा जणांचे घर सील केली आहेत. समस्तीपूर जिल्ह्यात दारूमुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि पटोरी ब्लॉकच्या रुपौली गावातील आणखी सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे जिल्हा एसपी एमएस ढिल्लन यांनी शनिवारी सांगितले. “रुपौली येथील रवींद्र राय यांच्या घरातून ब्रँडेड मॅकडॉवेलची बाटली देखील सापडली आहे, जो भारतीय सैन्यातील कर्मचारी होता आणि दिवाळीच्या सुट्टीवर आला होता,” असे एसपी ढिल्लन यांनी सांगितले. रवींद्रचे वडील महेश्वर राय यांनी मीडियाला सांगितले की, त्यांच्या मुलाने दिवाळीच्या रात्री पार्टी ठेवली होते आणि “विदेशी” दारू दिली होती. एसपी म्हणाले की, एका बीएसएफ अधिकाऱ्याने दुसरी पार्टी आयोजित केली होती जिथे चार जणांचा मृत्यू झाला.

सर्वसामान्यांच्या आरोग्याचे कारण देत बिहार सरकारने दारूविक्रीवर बंदी घातली आहे. असे असताना बिहारमध्ये विषारी व अवैध दारूमुळे लोकांचे मृत्यू होत असल्याने सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बिहार सरकार दारूच्या अवैध धंद्यावर लगाम लावण्यात अयश्स्वि ठरली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि बनावट दारूच्या घटनांबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच दोषी अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. या नंतर निष्काळजीपणाच्या आरोपावरून राज्य सरकारने नौतन आणि लॉरिया पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना निलंबित केले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget