मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

मुंबई - मनी लॉन्ड्रिंगप्रकणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाणार आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कोठडी सुनावण्यात आल्याने देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना मध्यरात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सकाळी जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यता आली आहे. अॅड. विक्रम चौधरी आणि अॅड. इंद्रपाल सिंग यांनी देशमुख यांच्याबाजूने कोर्टात युक्तिवाद केला. देशमुख यांचे वय झाले आहे. त्यांचा खांदा निखळलेला आहे. त्यामुळे त्यांना एक सहकारी देण्यात यावा. तसेच त्यांना घरचे जेवण देण्यात यावे. त्यांना हायपर टेन्शन आहे आणि त्यांना कोविडची बाधाही झाली होती. त्यामुळे त्यांना कोठडी देऊ नये अशी मागणी या दोन्ही वकिलांनी केली होती. मात्र, देशमुख हे तपासात सहकार्य करत नाहीत. त्यांना अनेक नोटीसा पाठवल्यानंतरही ते चौकशीला आले नाहीत. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांना कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंतची ईडी कोठडी सुनावली. दरम्यान,६ नोव्हेंबरनंतर देशमुखांचे वकील हे देशमुखांच्या आजारपणाचे कारण देऊन त्यांना जामिनावर सोडण्याची विनंती करतील. आताही देशमुखांचे वकील जामिनासाठी अर्ज करतील. पण त्यांना जामीन मिळेलच असे नाही, असे ज्येष्ठ वकील उदय वाळूंजकर यांनी सांगितले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget