सिद्धूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग

चंदीगढ - पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे, नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाचा राजीनामा मागे घेतला. २८ सप्टेंबरला पंजाबचे पोलीस महासंचालक, आणि अ‍ॅडव्हकेट जनरल यांची बदली करावी या मागणीसाठी त्यांनी आपला राजीनामा दिला होता. शुक्रवारी त्यांनी राजीनामा मागे घेतला असून, नवे अ‍ॅडव्हकेट जनरल नियुक्त होताच मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार सांभाळेल असे त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा सिद्धू  यांनी आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला आहे. गुरु ग्रथ साहिबचा आपमान आणि ड्रग्स प्रकरणाचा तपास करण्यामध्ये पोलीस महासंचालकांची भूमीका महत्त्वपूर्ण आहे. सध्या पंजाबमध्ये हे दोन मुद्दे कळीचे बनले असून, २०१७ मध्ये याच मुद्द्यांवर काँग्रेसला सत्ता मिळाली होती. मात्र तरी देखील तपासात प्रगती न झाल्याने अखेर मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंदर सिंग यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिखांचा पवित्र ग्रथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्याप्रकरणी पंजाबमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये गोळीबार झाला होता. गोळीबार प्रकरणी सिद्धू यांनी त्यांच्याच पक्षाचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर आरोप केले होते. नवे मुख्यमंत्री आल्यानंतरही ५० दिवस उलटून देखील गुरु ग्रंथ साहिब अवमान प्रकरणात आणि ड्रग्स प्रकरणात कोणतीही कारवाई का झाली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच पोलीस महासंचालक आणि अ‍ॅडव्हकेट जनरल यांची बदली करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती. नवज्योत सिंग सिद्धू यांनी २८ संप्टेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यावेळी सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना एक पत्र  लिहीले होते. या पत्रात सिद्धू यांनी म्हटले होते की, मी पंजाबच्या विकासाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करू इच्छित नाही, त्यामुळे मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी जरी राजीनामा दिला असला तरी देखील काँग्रेससाठी यापुढेही काम करतच राहील. मात्र आता सिद्धू यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याने, पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकीय घडमोडींना वेग आला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget