त्रिपुरा हिंसाचार ; १०२ट्विटर अकाउंट विरोधात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

त्रिपुरा - गेल्या महिन्यात त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल त्रिपुरा पोलिसांनी १०२ ट्विटर अकाउंट्स विरोधात दहशतवादी कारवायांना प्रतिबंध कायदा (UAPA) लागू केला आहे. त्रिपुरा पोलीस जनसंपर्क अधिकारी ज्योतिषमान दास चौधरी यांनी सांगितले की, त्रिपुरा पोलिसांनी UAPA अंतर्गत १०२ ट्विटर अकाउंट्स विरोधात उत्तर त्रिपुरामध्ये पानसागर हिंसाचाराशी संबंधित बनावट आणि विकृत माहिती पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हे ट्विटर अकाउंट्स कोण वापरतात त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ते म्हणाले की, यापूर्वी पोलिसांकडून तपास करण्यात येत होता मात्र हा खटला आता त्रिपुरा पोलिसांच्या गुन्हे शाखेला देण्यात आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, राज्यात जातीय हिंसाचाराच्या विविध घटनांसंदर्भात राज्य पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती आणि राज्यातील दोन धार्मिक गटांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी अफवा पसरवल्याबद्दल अनेक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्रिपुराचे महानिरीक्षक (IG) कायदा आणि सुव्यवस्था प्रभारी सौरभ त्रिपाठी यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, त्रिपुराच्या पानीसागरमध्ये हिंसा दर्शवणारे नकली फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहेत. ते म्हणाले की हे काही “देशविरोधी” घटक पसरवत आहेत. त्रिपुरातील एकाही मशिदीला आग लागल्याची घटना घडली नसल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी काही तक्रारी नोंदवून घडल्या प्रकाराचा तपास सुरू केला आहे. यापूर्वी त्रिपुरा उत्तर रेंजचे डीआयजी म्हणाले होते की, सोशल मीडियावर विकृत अफवा पसरवल्या जात होत्या ज्यामुळे दोन धार्मिक समुदायांमध्ये उच्च तणाव निर्माण होऊ शकतो. पण ते म्हणाले की, बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मिरवणुकीदरम्यान काही हल्लेखोरांनी हिंसाचाराचा केला.दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) त्रिपुराच्या उत्तरेकडील जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचा अहवाल मागवला आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांच्या तक्रारीवर एनएचआरसीने त्रिपुराचे मुख्य सचिव, पोलीस विभागाचे डीजीपी आणि राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. यासोबतच कारवाईचा अहवाल चार आठवड्यांत सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget